आतापर्यंत हजार वेळा हा प्रश्न विचारला गेला असेल आणि तरीही प्रत्येक वेळी मला हमखास विचारात पाडतो. (माझ्या "सायंटिस्ट" मित्र-मैत्रिणींना हा अनुभव काही नवा नसणार!) हा प्रश्न विचारणार्या मंडळींमध्ये प्रमुख म्हणजे- आई-बाबा (हो, हो, अजूनही), मी ज्यांना शिकवतो ती मुलं, जीव-शास्तरातली माझी मित्र-मंडळी (ही पण!), अणि संगणक-अभियंते (यांच्याबद्दल तर सांगणे न लगे)… असो!
या प्रश्नाच्या उत्तरावर कधी-कधी मजेदार प्रती-प्रश्न विचारले जातात… मागे एकदा मी तीमारपूर वस्तीतल्या एका मुलाला जेंव्हा सांगितलं की "हम रिसर्च करते हैं" तेंव्हा त्याने दरवाज्याच्या बिजागरीकडे बोट दाखवून मला विचारलं "मतलब? आप ये ठीक करते हो?". आता मी नेहमीच काही इतका मुर्खपणा करत नाही, त्यामुळे बर्याचदा लोक गोंधळल्या सारखं "म्हणजे नक्की काय?" इतकंच विचारतात. याचं दुसरं टोक म्हणजे जीव-शास्त्रातले काही महाभाग सुद्धा मला जैव-माहिती शास्त्रज्ञ समजतात (त्याबद्दल नंतर कधीतरी.)
"म्हणजे नक्की काय रे?"
सांगतो! सगळं नीट सांगतो! अगदी सुरुवातीपासून.

या सगळ्या गोंधळाचा एकदाचा निस्तरा करावा या हेतूने हा प्रपंच… खरं तर दोन हेतू आहेत- १. मी नक्की काय करतो हे समजावणे… २. "सायंटिस्ट" लोकांबद्दल आणि वैज्ञानिक संशोधनाबद्दल सामान्य लोकांना सहज-सोप्या भाषेत काही गोष्टी समजावून सांगणे.
तर, मी एक सायंटिस्ट/संशोधक आणि (सध्या) संगणकीय जैव-शास्त्रज्ञ आहे आणि मला- 'जीवाणू कसे जगतात, त्यांचं कार्य कसं चालतं, त्यांची उत्क्रांती कशी होते' इ. प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यात अणि ती समजून घेण्यात रस आहे.
"म्हणजे नक्की काय रे?"
सांगतो! सगळं नीट सांगतो! अगदी सुरुवातीपासून.
आता तुम्हाला विज्ञान-संशोधकांबद्दल पुसटशी का होईना माहिती असेलंच! चंद्र-सुर्य-ग्रह-ता-यांबद्दल, (नुकत्याच 'सापडलेल्या') 'हिग्ग्ज'च्या कणाबद्दल, कर्करोगाबद्दल, स्टेम-सेल्स (stem-cells, मुळ-पेशी, स्कंध-पेशी) बद्दल, नव-नवीन औषधं अन लसींबद्दल, आणि झालंच तर मन-मेंदू-वर्तणूक यांबद्दल वर्तमान-पत्रांतून छापून येणारे शोध लावणारी मंडळी म्हणजे- सायंटिस्ट!! बरोब्बर! पण आपल्याला अजून काही मुद्द्यांबद्दल विचार केला पाहिजे-
१. निसर्गात अजूनही अनेकविध गोष्टी आहेत (माहित असलेल्या आणि नसलेल्यासुद्धा!).
२. संशोधक शोध लावतात कसे?
वरील मुद्द्यांचा तपशीलात जाउन वेध घेणारे काही लेख लिहिण्याचा माझा मानस आहे. मला आशा आहे की यांतून विज्ञान आणि निसर्गाबद्दल होणारं आकलन तुम्हाला आनंद-दायक ठरेल!
तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासही मला आवडेल. तुमचे अभिप्राय नक्की कळवा…
No comments:
Post a Comment