Motivation

“Motivationचा complete भोसडा वाजला आहे.”

हे वाक्य गेल्या आठवड्याभरात हजार वेळा झालय़ घोकुन… मनातल्या-मनात, स्वत:शी, मित्रांपाशी, आणि आता तर चायला लिहायलाच घेतलं… (नशिब! तेवढ्यासाठी तरी motivation शिल्लक आहे…) दिवसच्या दिवस motivation नाहिये म्हणुन टवाळक्या करत वाया चाललॆत आणि रात्री गावभर उंडारतोय कसं आणि कुठे शोधू म्हणुन…

व्यवस्थित असं शेवटचं कधी दिसलं होत, तेही भोसडीचं नीट आठवत नाही. नाही म्हणायला अधुन-मधुन असं motivation नावाचं काहीतरी असतं/होतं आपल्या आयुष्यात पण अशी जाणिव करुन द्यायला मलाच उमाळे येतात कुत्तरड्याचे!

वरुन साले दीड कवडीचे लोकसुद्धा आम्हाला कसं दीड दमडी कमावण्यासाठी motivation लागत नाही म्हणत वाकुल्या दाखवतात. आणि त्याचाही कळस म्हणजे भोसडीचे ते शुन्य कवडीचीसुद्धा किंमत नसलेले (पण दुस-याची किंमत ठरवायचा अधिकार मिळालेले) लोक, आमच्याकडे आतुनच motivation कसं नाही म्हणुन, दीड दमडीच्या लोकांकडे कौतुकाने बघत आम्हाला निकम्मे ठरवुन मोकळे होणार… ** लेकाचे.

बरं, स्वप्नच पाहिली नसती कधी तर प्रश्नच नव्हता… पण तेव्हा उमजलंच नाही ना. अर्धवट स्वप्नं पाहुन ठेवली ढीगभर… आता निस्तरायची कशी ते कळत नाहीये… स्वप्न जुमानत नाहीत पुर्णपणे अजुन एवढं नशीब समजायचं… नाहीतर तीही निघुन जायची कंटाळुन. मग काय? Complete भोसडाच…*

*स्वप्नं विकायचे प्रयत्नसुद्धा करुन झालेत. तीही सहजासहजी कुणी घेत नाही लेकाची…

----------