मी नक्की काय (काम) करतो?

आतापर्यंत हजार वेळा हा प्रश्न विचारला गेला असेल आणि तरीही प्रत्येक वेळी मला हमखास विचारात पाडतो. (माझ्या "सायंटिस्ट" मित्र-मैत्रिणींना हा अनुभव काही नवा नसणार!)  हा प्रश्न विचारणार्या मंडळींमध्ये प्रमुख म्हणजे- आई-बाबा (हो, हो, अजूनही), मी ज्यांना शिकवतो ती मुलं, जीव-शास्तरातली माझी मित्र-मंडळी (ही पण!), अणि संगणक-अभियंते (यांच्याबद्दल तर सांगणे न लगे)… असो!

या प्रश्नाच्या उत्तरावर कधी-कधी मजेदार प्रती-प्रश्न विचारले जातात… मागे एकदा मी तीमारपूर वस्तीतल्या एका मुलाला जेंव्हा सांगितलं की "हम रिसर्च करते हैं" तेंव्हा त्याने दरवाज्याच्या बिजागरीकडे बोट दाखवून मला विचारलं "मतलब? आप ये ठीक करते हो?". आता मी नेहमीच काही इतका मुर्खपणा करत नाही, त्यामुळे बर्याचदा लोक गोंधळल्या सारखं  "म्हणजे नक्की काय?" इतकंच विचारतात. याचं दुसरं टोक म्हणजे जीव-शास्त्रातले काही महाभाग सुद्धा मला जैव-माहिती शास्त्रज्ञ समजतात (त्याबद्दल नंतर कधीतरी.)

या सगळ्या गोंधळाचा एकदाचा निस्तरा करावा या हेतूने हा प्रपंच… खरं तर दोन हेतू आहेत- १. मी नक्की काय करतो हे समजावणे… २. "सायंटिस्ट" लोकांबद्दल आणि वैज्ञानिक संशोधनाबद्दल सामान्य लोकांना सहज-सोप्या भाषेत काही गोष्टी  समजावून सांगणे.
तर, मी एक सायंटिस्ट/संशोधक आणि (सध्या) संगणकीय जैव-शास्त्रज्ञ आहे आणि मला- 'जीवाणू कसे जगतात, त्यांचं कार्य कसं चालतं, त्यांची उत्क्रांती कशी होते' इ. प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यात अणि ती समजून घेण्यात रस आहे.

"म्हणजे नक्की काय रे?"
सांगतो! सगळं नीट सांगतो! अगदी सुरुवातीपासून.

आता तुम्हाला विज्ञान-संशोधकांबद्दल पुसटशी का होईना माहिती असेलंच! चंद्र-सुर्य-ग्रह-ता-यांबद्दल, (नुकत्याच 'सापडलेल्या') 'हिग्ग्ज'च्या  कणाबद्दल, कर्करोगाबद्दल, स्टेम-सेल्स (stem-cells, मुळ-पेशी, स्कंध-पेशी) बद्दल, नव-नवीन औषधं अन लसींबद्दल, आणि झालंच तर मन-मेंदू-वर्तणूक यांबद्दल वर्तमान-पत्रांतून छापून येणारे शोध लावणारी मंडळी म्हणजे- सायंटिस्ट!! बरोब्बर! पण आपल्याला अजून काही मुद्द्यांबद्दल विचार केला पाहिजे-
१. निसर्गात अजूनही अनेकविध गोष्टी आहेत  (माहित असलेल्या आणि नसलेल्यासुद्धा!).
२. संशोधक शोध लावतात कसे?

वरील मुद्द्यांचा तपशीलात जाउन वेध घेणारे काही लेख लिहिण्याचा माझा मानस आहे. मला आशा आहे की यांतून विज्ञान आणि निसर्गाबद्दल होणारं आकलन तुम्हाला आनंद-दायक ठरेल!

तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासही मला आवडेल. तुमचे अभिप्राय नक्की कळवा…


What do I do?


This has been a question that has been asked a hundred times and one that still always makes me think before answering. The people asking this question range from my parents, kids I teach, colleagues in Biology, to software engineers (you guessed it right- in decreasing order of general awareness about the world ;)). My answers (depending on a lot of factors) often evoke yet more interesting questions. Most recently, when I told a kid from the basti that hum research karte hai (pardon my exceeding but temporary stupidity), he asked me- mutleb, aap ye (pointing towards the hinges of the nearest door) thik karte ho? I am not so stupid all the time and often people are more forgiving and reply with only a quizzical look or a confused "meaning?" or "what do you do, exactly?". (At the other end, colleagues in Biology mistake me for a bioinformatician, but more on that later some time...) To communicate what I really do, and more importantly, as a small attempt to increase public understanding of science and scientific research, and scientists, I have decided to answer this question in some detail here. I am afraid it will turn out to be longish, so once it is done, I will insert a one-paragraph guide to help people find the most relevant bit.

So, I am a researcher/scientist, biologist, and (currently) a computational biologist interested in understanding how microbes work and evolve.

People are vaguely quite aware of what scientists are- "scientists are people who do the work reported in the news about our moon, other planets, stars etc., (or lately) Higg's boson, cancer, stem cells, new drugs/vaccines or (at most) the brain and behaviour". And they use the microscope! That's right! But note two things-
1. our natural world is much much more diverse than that.
2. how do scientists exactly find out how the world works?

What will follow is a series of articles that will address the above issues in detail.
Hope you enjoy reading them and enjoy the understanding! I will be very glad to answer your questions and receive feedback.